नाशिक : कायद्याची अंमलबजावणी करणे ही ज्यांची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाºयाकडूनच जेव्हा शासकिय कामात अडथळा आणून आपल्या पोलीस दलातील शिपाई दर्जाच्या कर्मचाºयाला वर्दीवर असताना सार्वजनिक ठिकाणी मारहाण व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडतो तेव्हा कायद्याचा भंग होऊन ‘खाकी’ला डाग लागतो. द्वारका चौकात अशी घटना घडली असून याप्रकरणी पोलीस शिपायाने संबंधित सहायक उपनिरिक्षकाविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी (दि.७) रात्री पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये कोम्बींग आॅपरेशन सुरू होते. सीआर मोबाइल वाहनवर कर्तव्य बजावत असलेले पोलीस शिपाई सचिन चौधरी नानावली परिसरात गस्तीवर असताना मथुरा हॉटेल द्वारका येथे रस्त्यावर वाद सुरू असल्याचा बिनतारी संदेश पोलीस ठाण्याकडून तत्काळ सीआर मोबाईल वाहनाला मिळाला. चौधरी हे तत्काळ वाहनासोबत द्वारका येथे दाखल झाले. यावेळी पळशीकर हे एका असलम तस्सवूर शेख नावाच्या इसमासोबत वाद घालताना आढळले. रात्रीचे साडेबारा वाजत असल्यामुळे चौधरी यांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवून घरी जाण्यास सांगितले; मात्र याचा राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा काय मला शिकवितो, अन् पोलीस स्टेशनला घेउन जातो...’असे सांगून चौधरी यांच्या कानशीलात लगावली. दरम्यान, चौधरी यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. सुर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकाचे वाहन पाठवून तत्काळ मदत दिली. याप्रकरणी सहायक आयक्त, उपआयुक्त व दस्तुरखुद्द आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्यात पळशीकर यास कधीही भद्रकाली पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.
‘दबंग’ पोलिस अधिकाऱ्याने शिपायाच्या कानशिलात लगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 7:41 PM
राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा काय मला शिकवितो, अन् पोलीस स्टेशनला घेउन जातो...’असे सांगून चौधरी यांच्या कानशीलात लगावली. दरम्यान, चौधरी यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली.
ठळक मुद्देपळशीकर यास कधीही पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता