नाशिक : महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा आॅल इंडिया स्टुडंट फे डरेशनचे नेते (एआयएसएफ) कन्हैया कुमार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील तपास यंत्रणाही सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप करतानाच क न्हैया कुमार शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. २०) भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. देशात लोकशाही व तर्कशुद्ध विचार मांडणाºयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जाहीररीत्या कोणी भूमिका मांडत असल्यास त्यांच्यावर हल्ले होतात किंवा हत्या केली जाते. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेशसारख्या व्यक्तींसोबतही हाचप्रकार घडला. परंतु तपास यंत्रणांवर भाजपा सरकारचा दबाव असल्याने महाराष्ट्र पोलिसांसह सीबीआयला या प्रकरणाचा तपास पाच वर्षांत लावता आला नाही. मात्र कर्नाटकमध्ये गैरभाजपा सरकार असल्याने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासातून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकºयांपर्यंचे धागेदोरे मिळाल्याने दाभोलकऱ्यांच्या मारेकºयांना अटक झाल्याचा दावा कन्हैया यांनी केला आहे. सरकार तपास यंत्रणा, माध्यमे तसेच न्याययंत्रणांना कमकुवत करीत असल्याचे सांगत न्यायमूर्ती लोया प्रकरणातही याचाच प्रत्यय आला. दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा बंदोबस्त असतानाही गोळ्या चालविणाºयांनाही सरकारचे संरक्षण असून, उमर खालिदवरील हल्ल्याचा उल्लेख करून एवढ्या बंदोबस्तात गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित करताना हा सत्तेविरोधात बोलणाºयांचा आवाज दाबण्याचा आणि देशवासीयांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कन्हैयाने केला आहे. देशात जमावाच्या मारहानीचे प्रकार वाढत आहे. अशी मारहाण करणाºयांनाही सरकारचेच संरक्षण असून, देशात भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी असे प्रकार घडवले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
निवडणुका व्यक्तीकेंद्रित करण्याचा घाटलोकशाहीत होणारी निवडणूक ही पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे, तर संसदेचे सदस्य निवडण्यासाठी होते. परंतु, भाजपाने निवडणुका व्यक्तीकेंद्रित करण्याचा घाट घातला असून, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलनात्मक लढत रंगवली जात आहे. प्रत्यक्षात निवडणूक लोकसंख्येचे ४५४ सदस्य निवडण्यासाठी होणार आहे, यापासून संपूर्ण देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी हा घाट घातला जात असल्याची प्रतिक्रिया कन्हैया यांनी व्यक्त केली आहे.