नाशिक : सिन्नर - शिर्डी रोडवर प्रवासी वाहने लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या अजित ऊर्फ अजय दत्तात्रय धनाड (रा़ सवत्सर, ता़ कोपरगाव ) यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चुंचाळे गाव शिवारातून अटक केली आहे़ त्याच्या उर्वरित साथीदारांना ५ मार्च २०१६ रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा फाट्यावर सापळा रचून अटक केली़ मात्र त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन धनाड फरार झाला होता़ या टोळीने नाशिक-सिन्नर रस्त्यासह अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ दरम्यान, धनाड हा मित्राला भेटण्यासाठी चुंचाळे शिवारात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यानुसार सापळा लावून त्यास अटक करण्यात आली़ (प्रतिनिधी)
दरोडेखोरांच्या म्होरक्यास चुंचाळे शिवारातून अटक
By admin | Published: March 13, 2016 12:13 AM