- संजय पाठक
नाशिक- खड्डे युक्त नाशिक- ठाणे रस्ता आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे जणू समिकरणच झालेले आहे. आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मार्गाची पहाणी केली, मात्र, नाशिकहून जाणाऱ्या पालकमंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथील वाहतूक काेंडी आणि बेशिस्त वाहतूकीचा प्रकार आढळल्याने ते स्वत:च मोटारीतून खाली उतरले आणि वाहतूक सुरळीत करताना पोलीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली.
नाशिक- मुंबई मार्ग हा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. टोल भरून देखील या मार्गाची दरवर्षीच दुरवस्था होत असते. यासंदर्भात विधी मंडळात आवाज उठवल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे ठाणे येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या उदघाटनासाठी जात असताना कल्याण फाटा येथे वाहतकू केांडी दिसल्याने ते स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली मात्र, त्याचवेळी येथील पोलीस चौकीसमोर देखील अनेकट्रक उभे दिसल्याने भुसे महामार्गावर ट्रक उभे कसे म्हणून येथील पेालीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महानगर प्रमुख प्रविण तिदमे देखील उपस्थित हेाते.