शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरावर संस्था दादा भुसे : घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी परिषदेत कामकाजाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:58 AM

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीयघटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल

नाशिक : शहरी व ग्रामीण प्रगतीच्या वाटचालीत विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घटनात्मक तरतुदींच्या आधारे विकासात्मक आराखडा तयार क रण्याची गरज आहे. त्यासाठी पदाधिकाºयांना प्रशिक्षणाची गरज आहे. सध्या पुण्यात यशदाच्या माध्यमातून, असे प्रशिक्षण दिले जात असले तरी ग्रामपंचायत स्तरावरील बहुतेक पदाधिकाºयांना हे प्रशिक्षण घेणे शक्य होत नसल्याने शासनाकडून जिल्हास्तरावर पदाधिकारी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातील शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात ७३ व ७४ व्या घटनादुरुस्ती रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.५) विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे,अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे व महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीला २५ वर्षांचा कालवधी उलटला असताना स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारकडून राबविण्यात येणाºया विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. अनेक ग्रामीण वाड्या-वस्त्यांसह विविध गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शहरासह विविध ग्रामीण भागात वस्त्र व निवाºयापासून वंचित नागरिकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कायद्याच्या चौकटीत नियोजनबद्ध योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. परिषदेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरसेवकांसह स्थानिक स्वराचे संस्थांचे प्रतिनिधी उपलब्ध होते. कुलगुरू ई. वायुनंदन यांनी प्रास्ताविक करताना विभागीय परिषदेच्या माध्यमातून घटनादुरुस्तीनंतर साध्य होऊ न शकलेल्या कामांवर व योजनांवर चर्चा होणार असल्याने घटनादुरुस्तीचे उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणे अधिक सहज व सोपे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. विजया पाटील यांनी केले. प्रा. रघुनाथ गावडे यांनी आभार मानले.प्रगती व पुढील दिशामुक्त विद्यापीठातील विभागीय परिषदेत ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतरच्या २५ वर्षांत झालेली ‘प्रगती व पुढील दिशा’ यविषयाला अनुसरून‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन परस्पर संबंध’ विषयावर पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सर्व समावेशक प्रशासन व निवडणूक सुधारणा आदी विषयांवरही चर्चा झाली, तर अखेरच्या सत्रात दिवसभरात झालेल्या विविध विषयांवर खुल्या चर्चासत्रानंतर परिषदेचा समारोप करण्यात आला. या परिषदेचे विभागातील पाचही जिल्ह्णात थेट प्रक्षेपण करण्यात आले.उद््घाटनाच्या समारोपाला महापौरांचे आगमनपरिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी यांची अनुपस्थिती जाणवत असतानाच त्यांचे आगमन झाले. परंतु तोपर्यंत उद्घाटन सोहळा आटोपून आभार प्रदर्शनाचे सोपस्कर सुरू झाले होते. याचवेळी महापौरांसह उपमहापौर अजिंक्य गिते, गटनेते दिनकर पाटील यांचे आगमन झाल्याने आभार प्रदर्शन थांबवून महापौरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या उशिराने पोहोचण्याच्या सवयींवर चांगलीच चर्चा रंगली.