संदीप भालेराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सन २०२० जागतिक परिचारिका वर्ष म्हणून साजरे केले जात असून, बुधवार, दि. ६ पासून देशात परिचारिका सप्ताहदेखील सुरू झाला आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाविरोधात लढत असताना या लढाईत परिचारिकांचादेखील कोरोनाविरोधात संघर्ष सुरू आहे. कोरोना रुग्णाच्या सर्वाधिक संपर्कात असणाऱ्या परिचारिका आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवेचे व्रत सांभाळत आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या परिचारिका आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहत कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी झाल्या आहेत.जागतिक परिचारिका वर्षात परिचारिका भगिनी कोरोनाशी लढा देत रुग्णसेवा करीत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहत लढणाºया परिचारिकांच्या हिमतीच्या अनेक कथा त्यांच्या रुग्णसेवेची साक्ष देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील परिचारिका भगिनींचादेखील रोजच मृत्युशी सामना करीत कोरोनाविरोधात लढण्याचा संघर्ष करीत आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणाºया परिचारिकांचा लढा आरोग्य यंत्रणेत तितकाच महत्त्वाचा आहे. नाशिक जिल्ह्यातून २० भगिनी मालेगाव, चांदवड येथे पाठविण्यात आल्या असून, तेथे त्या आपल्या कुटुंबापासून दूर राहत कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. अडचणी अनेक आहेत, परंंतु शासकीय आदेशाचे पालन करीत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि सामान्य रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रात कामकाज करीत आहेत.प्रत्येक तालुक्यात किमान पाच परिचारिका कोरोनाशी लढण्यासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. कोरोनाच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेकडून फारसे गांभीर्य दाखविले जात नसताना दुसरीकडे कोरोना यांसारख्या महाभयंकर विषाणूशी या परिचारिका रोजच लढा देत आहेत. समाजाचा रोष ओढावून घेत या परिचारिका आपल्या कर्तव्यात कुठेही कमी नाहीत. कोरोनाच्या काळात तर रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि राहण्याच्या ठिकाणी अनेकदा अवहेलना वाट्याला येऊनही या जिगरबाज परिचारिका हिमतीने कोरोनाशी लढा देत आहेत. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्यासाठीही एकदा टाळ्या वाजल्या तर त्यांनाही अधिक बळ मिळेल.-----------यंदा जागतिक परिचरिका वर्ष साजरे केले जात आहे. त्याला साजेशी कामगिरी आमच्या परिचारिका भगिनी करीत आहेत. कोविड-१९ च्या कामात सर्व परिचारिकांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. खºया अर्थाने त्या फ्लोरेन्स नाईटिंगले यांचा रुग्णसेवेचा वसा पुढे चालवित आहे. त्यांचा कामाचा नक्कीच अभिमान आहे.- शोभा पाटील, (खैरनार), राज्यध्यक्ष, नर्सेस संघटना
रोजच मृत्यूशी सामना आणि जगण्याचाही संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 11:29 PM