येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाऱ्या आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाºया आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.-------------------शासनाने लक्ष घालण्याची मागणीपशुधनासाठी आवश्यक असणारा खुराक, चारा महागला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही सध्या मिळणाºया दराने फिटणारा नाही. परिणामी दुग्ध व्यवसाय तोट्यात आला आहे. शासनाने याप्रश्नी लक्ष घालून दुग्ध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दुग्ध व्यवसायिकांकडून केली जात आहे.-----------------वाढत्या महागाईत पशुधन सांभाळणे अवघड बनत चालले आहे. जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी घेणे, गोठ्याची स्वच्छता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्वत:सह घरातील माणसांना करावी लागतात. एवढी मेहनत करूनही पाण्यापेक्षा कमी दरात दूध विकावे लागत आहे.- अण्णासाहेब खैरनारदूध उत्पादक शेतकरी, गारखेडा
दुग्ध व्यवसाय संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 8:45 PM