लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरातील दुग्ध व्यावसायिकांवर आर्थिक कुºहाड कोसळल्याने व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडला आहे.रब्बी व खरीप हंगामातील अनेक संकटांचा सामना करून शेतकरीवर्ग आता कुठे तरी विकासाची पाऊले टाकत असताना पुन्हा त्याच्यापुढे कृत्रिम संकट उभे राहिले आहे ते म्हणजे जोडधंदा दुग्ध व्यवसायाला लागलेले कमी दराचे ग्रहण. शेतामध्ये पिकविलेल्याला कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय आधार देत होता; परंतु अलीकडील काळात दूध व्यवसायाला कोणत्याही प्रकारचा दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाकडून दुग्ध व्यवसायाला जी सवलत मिळते त्या सवलतीमध्ये दूध व्यवसायावर खर्चसुद्धा भागत नाही. तालुक्यातील बरेच शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले आहेत. कोरोनाच्या अगोदर काळात शेतकरीवर्गाला दुधाने चांगला दर प्राप्त करून संकटातून तारुण नेले होते. परंतु आता दुधाला रस्त्यावर फेकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. ग्रामीण भागात शेतकरीवर्गाकडून जोडधंदा म्हणून दूध व्रिकीला अधिक पसंती दिली जाते. तसेच शेतीपूरक जोडधंदा, शेती संलग्न जोडधंदा, शेतीसाठी भांडवल तयार करून देणारा जोडधंद्यांना पसंती असते. दुधाचा दर नसल्याने शेतकरी संकटात आहे.आम्ही शेतीमध्ये काबाड कष्ट करूनही कष्टाचा मोबदला मिळत नाही. त्यासाठी आम्ही जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाची निवड केली. परंतु कोरोनामुळे हॉटेल, कंपन्या बंद झाल्याने या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.- दीपक मोगल, दुग्ध व्यावसायिक, लखमापूर.
...या आहेत मागण्यादुधाला प्रतिलिटर सरसकट ३० रुपयांहून अधिक दर मिळावा, गायीच्या दुधाला दहा रुपये तर दुध भुकटीला निर्यातीसाठी ५० रु पये अनुदान मिळावे, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.