सप्तशृंगगड : गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी दि. ७ रोजी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र ट्रस्टला निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथील काम करणारे सर्व कामगार कर्मचारी नाशिक वर्कर्स युनियन (सिटू संलग्नचे सभासद आहेत. या कामगार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत वेळोवेळी ट्रस्टला निवेदन दिले आहे. यातील सिटू संलग्नाच्या मध्यस्तीने काही प्रश्न मार्गी लागले आहेत, मात्र मुख्य प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. याबाबत. आमदार नितीन पवार यांनाही निवेदन दिले आहे. सप्तशृंग गड चेअरमन विश्वस्त मंडळ, कळवण पोलीस ठाणे, कामगार आयुक्त आदी ठिकाणी धरणे आंदोलन करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.अशा आहेत मागण्यागेल्या अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या १२५ कामगारांना कायम करण्यात यावे,सुरक्षा रक्षक यांना महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणे लागू असलेले किमान वेतन देण्यात यावे, सर्व कर्मचाऱ्यांचा २०१९-२०२० चा बोनस सानुग्रह अनुदान देण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी सरकारी अधिकारी याच्यामार्फत पडताळणी करण्यात यावी, मयत कामगारांच्या जागी वारसास नोकरीत सामावून घ्यावे, या मागण्यांचा समावेश आहे.