नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.यंदा नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व इगतपुरी या तालुक्यांतच पर्जन्यमान समाधानकारक राहिले. त्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या काही भागांत पडणाºया पावसाचा लाभ नाशिकच्या गंगापूर धरणासाठी, तर इगतपुरीच्या पावसाने काही प्रमाणात स्थानिक व काही पाणी थेट मुंबईसाठी बांधलेल्या धरणांमध्ये जाऊन पडले. पेठ, सुरगाणा या तालुक्यांच्या पाण्याचा आजवर फक्तगुजरात राज्यालाच फायदा झाला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा पावसाळ्यात जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये जेमतेम ७७ टक्केच जलसाठा होऊ शकला. त्यातही मध्यंतरीच्या काळात समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी जिल्ह्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडावे लागले, तर आगामी काळात नगर जिल्ह्याचे सिंचन व बिगरसिंचनाचे आवर्तन सोडणे बाकी आहे. त्यामुळे आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत सुमारे २० टक्के पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या ५६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाण्याची काळजी मिटली होती. यंदा त्या उलट परिस्थिती आहे.उपलब्ध जलसाठ्यातून रब्बीचे आवर्तन सोडावे लागणार असून, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी धरणांचे पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सध्या शिल्लक असलेल्या ५६ टक्के जलासाठ्यातून आगामी आठ महिन्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी पुरवावे लागणार आहे.गंगापूर धरणात ७० टक्के साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ७० टक्के साठा असून, समूहात ८१ टक्के साठा आहे त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली तरी, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक राहणार असल्याचे संकेत दिले आहे. अशावेळी गळती व बाष्पीभवनाचा विचार करता मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.
जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:20 PM
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देउन्हाळा कडक राहणार उपलब्ध जलसाठ्यावर आगामी आठ महिने काढण्याचे मोठे आव्हान