शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

धरणात पाणी, तरीही आणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:52 AM

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.दोन वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या दरम्यान पावसाने दडी मारल्याने गंभीर संकट उभे राहिले होते. त्यावेळी मराठवाड्यासाठी असलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. राज्यातील भाजपा सरकारने तसा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दोन वर्षे चांगला पाऊस होत आहे. यंदाही जून आणि जुलै या दोन महिन्यांत मुबलक पाऊस असून, दहा धरणे भरली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही मुबलक पाणी असल्याने विसर्ग करावा लागला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच महापालिकेने अनेक ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा आजही कायम ठेवला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना पाण्याचे कोणतेही नियोजन होत नाही. गंगापूर धरणातील हे पाणी जाणीवपूर्वक राखीव ठेवून नजीकच्या काळात ते मराठवाड्यासाठी देण्याचा भाजपाचा घाट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. नाशिक शहराला गरजेपुरते पाणी मिळत असताना नाशिकमध्ये पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप मराठवाड्यातील राजकीय नेत्यांकडून केला जातो. सध्या गरजेनुसार पाणी न वापरता नागरिकांना त्रास देऊन पाण्याची बचत केली जात आहे, तसे झाल्यास नाशिककरांना इतक्या पाण्याची गरज नाही हे मराठवाड्याचे म्हणणे खरे होऊ शकेल, असे बोरस्ते म्हणाले. गंगापूर धरण भरल्यानंतर महापौरांनी जलपूजन केले तेव्हाच ही मागणी आपण केली होती. परंतु तरीही त्याची दखल सत्ताधिकाºयांनी घेतली नसल्याचे बोरस्ते म्हणाले.