शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

धरण साठ्यात १० टक्क्यांनी वाढ

By admin | Published: September 19, 2015 11:27 PM

२४ तासात सरासरी ९० मिलीमीटरची नोेंद

नाशिक : शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या सलग १८ तासांच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठा सरासरी १० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १११६.२ (९० टक्के) मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि. १९) सकाळी मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश झाल्यानंतर दुपारी पावसाने तुरळक व मध्यम स्वरूपात हजेरी लावली.जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सलग १८ तास पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी (दि. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९० (१११६.२) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक-८३.६, इगतपुरी- १२६, दिंडोरी- ९७, पेठ- ९५.५, त्र्यंबकेश्वर- २८, मालेगाव - २२, नांदगाव- २३, चांदवड - ४५.२, कळवण - १४८.१, बागलाण - ७८, सुरगाणा - ११५, देवळा - ४२.६, निफाड - ९७.२, सिन्नर - ५२, येवला - ६१ असा एकूण - १११६.२ (सरासरी ९० टक्के) नोंदविण्यात आला. पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, खरिपास या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील धरण साठा

जिल्ह्यात शुक्रवारचा पाऊस होण्याआधी जेमतेम सरासरी ३२ टक्केपाणीसाठा होता. शुक्रवारच्या पावसानंतर तो थेट सरासरी ४२ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यातील धरण साठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात एकूण टक्केवारी- गंगापूर- ३७६६ (६७ टक्के),  काश्यपी - ९११ (४९), गौतम गोदावरी- ८८0 (४७), पालखेड- ६४७ (८६),  करंजवण- १७५८ (३३), वाघाड- १३0३ (५२), ओझरखेड- ५८१ (२७),  पुणेगाव- ४१५ (६७), तिसगाव- १७९ (४0), दारणा- ४९४९ (६९), भावली-१३८७ (९७), मुकणे- २२३७ (३१), वालदेवी- ८६१ (७६), नांदुरमधमेश्‍वर-१६९ (६६), कडवा- १४७0 (७९), आळंदी- ५५५ (५७), भोजापूर- ८२ (१८),  चणकापूर- २२५२ (८३), पुनंद- १0११ (७२),  हरणबारी- १0५४ (९0), केळझर- ४५८ (८0), नागासाक्या- 00 (0), गिरणा- ६५६ (४) असा एकूण जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प मिळून ६६ हजार ३५४ पैकी २७ हजार ५८१ (४२ टक्के ) दलघफू इतका झाला आहे.