शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जानेवारीपासून शहरवासीयांना मुकणे धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:38 AM

शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे.

नाशिक : शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे.  नाशिक शहराला सध्या गंगापूर धरण आणि चेहेडी बंधारा येथून पाणीपुरवठा केला जातो. सुमारे साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा शहरासाठी केला जात असला तरी वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे महापालिकेने कॉँग्रेस सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेचा प्रस्ताव मांडला होता. सदरचा प्रस्ताव अखेरच्या टप्प्यात सादर झाला आणि त्यानंतर तो केंद्र शासनाने मंजूरदेखील केला. या कामासाठी २२० कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात ज्यादा दराची निविदा मंजूर झाल्याने हे काम सुमारे २६५ कोटी रुपयांवर गेले आहे.सदरचे काम प्रगतिपथावर असून, त्यानुसार मुकणे धरणातील जॅकवेल (जलविहीर)चे काम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. धरणात पाणी असल्याने हे काम पूर्ण करण्यात व्यत्यय येत  आहे.  पाइपलाइन आणि अन्य कामे ९० टक्के तर संपूर्ण योजनेचे सरासरी काम ८६ टक्के इतके पूर्ण झाले आहे. या कामाची अंतिम मुदत जुलै अखेरपर्यंत होती, मात्र कामाला विलंब झाल्याने त्यातील अनेक कामे पूर्ण न झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डिसेंबरअखेरपर्यंत डेडलाईन दिली असून इतक्या वेळेत हे काम पूर्ण होणार असल्याने आता शहराला जानेवारी महिन्यापासून १३७ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे.‘येथील’ नागरिक ांना मिळणार दिलासासिडकोचा काही भाग, पाथर्डी गाव आणि रोड तसेच राजीवनगरपासून खाली अगदी दीपालीनगरपर्यंतच मुकणे धरणाच्या जलवाहिनी योजनेतून पाणी पुरवले जाणार असून त्यामुळे या भागातील पाणी समस्या सुटणार आहे. पाथर्डी ते इंदिरानगरपर्यंतच्या भागात काही ठिकाणी मध्यरात्री तर काही ठिकाणी पहाटे अशी पाणीपुरवठ्याची चमत्कारीक वेळ आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या प्रभाग क्रमांक ३० मधील पाणीप्रश्नाने उग्र रूप धारण केले असून, ेगेल्या आठवड्यात झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक झाले व त्यांनी सभेवर बहिष्कार घातला आहे. या सर्व भागांना दिलासा मिळणार आहे.नाशिक शहराला सध्या सुमारे साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो तो आता साडेपाचशे दशलक्ष लिटर्सपेक्षा अधिक होईल. अर्थात, गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यात जलवाहिन्यांची कामे करण्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गळतीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.मुकणे धरणातील जॅकवेल (जलविहीर)चे काम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. धरणात पाणी असल्याने हे काम पूर्ण करण्यात व्यत्यय येत आहे. पाइपलाइन आणि अन्य कामे ९० टक्के तर संपूर्ण योजनेचे सरासरी काम ८६ टक्के इतके पूर्ण झाले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका