सटाणा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली असताना राज्य शासनाने अवघ्या दहा गावांना दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमीत कमी एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.बागलाण तालुक्यात गेल्या १८ फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घालून मोसम, करंजाडी, कान्हेरी खोऱ्याला झोडपले होते. यात पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली होती. पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक कांदा पीक बाधित झाले तर गहू , हरभरा टमाटा, मिरची, अन्य भाजीपाला पीक, डाळिंब पिकाची हानी झाली होती. असे असताना बागलाण तालुक्यातील दहा गावांना फक्त १ कोटी ५४ लाख रुपयांची तुटपुंजी भरपाई देऊन बोळवण केली असल्याची टीका आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यासोबतच उर्वरित नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनाही भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या गावांना मिळणार भरपाई१८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या फळ पीक वगळून कांदा, कारले, मिरची, टमाटा, गहू, हरभरा पिकांना १ कोटी ५४ लाख ६७ हजार ४५ रुपये भरपाई अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेवरे येथील २, पिंगळवाडे येथील १७, विजय नगर येथील ४९, ताहाराबाद येथील १२७ ,रावेर येथील २४३ , मुल्हेर येथील ९, अंतापूर येथील ९०३ ,अंबासन येथील १५८ ,मोराणे येथील ५३ आणि काकडगाव येथील १२ अशा एकूण १५७३ शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.
नुकसान पन्नास गावांचे, भरपाई दहा गावांना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 10:34 PM
सटाणा : तालुक्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पन्नासहून अधिक गावातील पिकांची हानी झाली असताना राज्य शासनाने अवघ्या दहा गावांना दीड कोटी रुपयांची तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कमीत कमी एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देबागलाण तालुका : गारपीटची अवघी दीड कोटी रुपयांची मदत