मुंजवाड : मुसळधार पावसामुळे परिसरात आलेल्या पुरामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर नुकसान झालेला कांदा तत्काळ अल्पदरात विकावा लागणार आहे. येथील अरुण दशरथ खैरनार व काशीनाथ जाधव यांच्या विहिरी संपूर्ण गाळाने भरल्या आहेत. औंदाणे येथील हत्ती नदीच्या काठावर असलेल्या संपूर्ण विहिरी गाळाने भरल्यामुळे विद्युत पंपाचे नुकसान झाल्याची माहिती बाजार समितीचे उपप्रशासक, सभापती विशाल सोनवणे यांनी दिली आहे. तसेच लोकसहभागातून गावाने हत्ती नदीवर बांधलेला सिमेंट बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत.ज्या ठिकाणी पूरपाण्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना व कृषी सहायकांना दिले आहे. टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी सांगितले.(वार्ताहर)ं
मुंजवाडला नुकसानं
By admin | Published: August 06, 2016 12:02 AM