देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.महिनाभरापासून दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत व नंतर उघडीप होत होती. यामुळे शेतीची कामांचा खोळंबा होत आहे. रब्बीची तयारी लांबणीवर पडत चालल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. पावसामुळे शेतात उभे असलेले मक्याचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे. परतीच्या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा कांद्याचे बियाणे शेतात टाकले. परंतु सततच्या पावसामुळे हे बियाणे खराब झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतकरी उन्हाळी कांदा बियाणे मिळवण्यासाठी शोधाशोध करीत असून कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे बियाण्याचे दर गगाणाला भिडले आहेत.तालुक्यातील बहुतेक नदी नाल्यांना पाणी वाहत असून काही धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावलीडोंगरगाव येथे सततच्या पावसाने डाळिंब, मका, कांदा रोपे पूर्णपणे खराब झाली आहेत. डाळींब फळे गळून गेली असून लागवड केलेल्या कांद्यावर विविध रोगांचे आक्र मण झाले आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावल्यामुळे खते किंवा औषध फवारणी करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नाही. शासनाने केलेल्या पीक पंचनाम्याची दखल घेऊन विमा कंपनीने शेतकर्यांना त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी डोंगरगावचे सरपंच दयाराम सावंत, खंडू सावंत, लालजी सावंत, मोठभाऊ सावंत ,पंढरीनाथ सावंत, शंकर सावंत ,विनोद सावंत आदी शेतकर्यांनी केली आहे.फोटो :डोंगरगाव येथे कांदा, डाळींब पीकांचे झालेले नुकसान.(फोटो : 14देवळा1,2)
देवळा तालुक्यात कांदा रोपांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:33 PM
देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.
ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावली