गणेश धुरी नाशिकबंडखोरीमुळे एकलहरे गटातील शिवसेनेचे उमेदवार अजिंक्य गोडसे काहीसे अडचणीत सापडले आहेत. त्यातच या गटात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली आघाडी आणि बंडखोर उमेदवाराने उभे केलेले आव्हान, आधी मनसे आणि आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या एकलहरे गटाला चांगलेच हादरे बसत आहेत.पुत्रप्रेमापोटी खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून पुत्र अजिंक्य यांच्यासाठी उमेदवारी पदरात पाडून घेतली असली, तरी त्यांना पक्षातूनच उघड आव्हान एकलहरे सरपंच शंकर धनवटे यांनी दिले आहे. भाजपाकडून ज्ञानेश्वर पाळदे, कॉँग्रेसकडून ज्ञानेश्वर गायकवाड व अपक्ष शंकर धनवटे असे चार उमेदवार या गटात निवडणूक लढवित आहेत. मात्र गटाचा विचार करता या गटात मुख्य लढत शंकर धनवटे व अजिंक्य गोडसे यांच्यात असली तरी आघाडीचे उमेदवार प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड कशी लढत देतात, यावर गटातील तिरंगी लढतीचे चित्र तयार होईल.
बंडाळीच्या उठावाने बालेकिल्ल्याला हादरे
By admin | Published: February 19, 2017 1:34 AM