लोखंडेवाडी येथे प्रभाकर उगले यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडत झाड पेटले. सुदैवाने जवळपास कुणी नसल्याने इतर हानी झाली नाही. शिंदवड येथे रविवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास पूर्व मोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शिंदवड व परिसरात नदी-नाल्यांना पूर आला. त्यात पिकांचे नुकसान झाले असून या वादळी पावसाने ठिकठिकाणी झाडे पडली आहेत. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाने द्राक्षबागेतील काड्यांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी सिमला मिरचीच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. दिंडारी व चांदवड तालुक्यातील जोडणाऱ्या फरशीवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती.
फोटो- ३० दिंडोरी रेन १/२
===Photopath===
300521\30nsk_50_30052021_13.jpg~300521\30nsk_51_30052021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० दिंडोरी रेन १/२~फोटो- ३० दिंडोरी रेन १/२