पाटोदा : येथील शेतकरी पोपट कारभारी बोराडे यांच्या शेतातील वस्तीनजीक असलेल्या कडुनिंबाच्या वृक्षावर वीज पडल्याने वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या. वीज पडली त्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्य घरात थांबलेले होते. झाडाच्या फांद्या तुटून शेतातील टमाटा पिकावर पडल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.गेल्या वीस-बावीस दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे शुक्रवारपासून पुनरागमन झाले आहे. शनिवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास पाटोदा परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाने बरेच दिवस विश्रांती घेतल्यामुळे शेतातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन ही पिके कोमेजली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.
वीज पडून टमाटा पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:52 AM