पाळे खुर्द : परिसरात गेल्या १० दिवसापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने गिरणा नदीला पूर आला आहे. त्याच प्रमाणे धरणक्षेत्रात पाउसाचा जोर अधिक असल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.चणकापूर मधून १७१९१ क्यूसेसने तर पुनंद मधून ७४७८ क्यूसेसने पूर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. विविध धारणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. विविध छोटी-मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत.पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे नदी काठावरील शेतीसाठी धरणातील पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश आसोली, कळमथे, दह्याने, बर्डे गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच आदिवासी पट्यातही विक्र मी पाऊस सुरू आहे. नाले, ओहळांना पूर परिस्थिती असल्याने तेथील खेड्या-पाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सर्व नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे रस्ते जागोजागी बंद झाले आहेत. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.चणकापूर गिरणा नदी पत्रातील परिस्थिती अधिक गंभीर गिरणा नदी काठच्या दह्याने, कळमथे, विठेवडी, आसोली, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, मानूर, एकलहरे येथील शेतामध्ये पाणी घुसल्याने मका, ऊस, टमाटे, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात एकूण सुमारे ३०० मिमी पाऊस पडला आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नद्या-नाल्यांना पूर आला नव्हता. यावेळी पूर आला आहे. गेल्या १० दिवसापासून जोरदार पाऊस पडल्याने शेतकºयांना मोठा आधार मिळाला आहे.अति पावसाने शेतीतील पिकाचे प्रचंड नुकसान पिके पिवळी पडली आहेत काही शेतकºयांची जमिनी उपळून उठल्या आहेत. पावसामुळे शेतीकाम ठप्प झाली आहे. सतत पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकºयांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. सतत पडणाºया पावसाने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहेत. यावर्षी उशिरा पावसाने सुरुवात केली, मात्र पाळे खुर्द परिसरात पाणीच पाणी झले आहे.
पाळे खुर्द परिसरात मुसळदार पाऊस शेती पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:04 PM
पाळे खुर्द : परिसरात गेल्या १० दिवसापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने गिरणा नदीला पूर आला आहे. त्याच प्रमाणे धरणक्षेत्रात पाउसाचा जोर अधिक असल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे.
ठळक मुद्दे विविध छोटी-मोठी धरणे १०० टक्के भरली आहेत.