सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील सुमारे ९३ लाख रु पये खर्चून बांधलेली विहीर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या तीनच वर्षात कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आधीच शहरवासियांसमोर जलसंकट उभे ठाकले असतांना गुरु वारी (दि. २५) अचानक विहीर कोसळून भुईसपाट झाल्याने जलसंकट अधिकच गहिरे होणार आहे.सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारी ठेंगोडा नदी पात्रालगतची विहीर सुमारे ९३ लाख रु पये खर्चून बांधण्यात आली होती. गेल्या तीन मिहन्यांपूर्वी या विहिरीच्या निकृष्ट बांधकामामुळे तळाच्या बांधकामाला भगदाड पडले होते. याबाबत माजी नगरसेवक मनोज सोनवणे, भाजपचे नगरसेवक मुन्ना शेख यांनी आवाज उठवून कामाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र काही पुढाºयांनी राजकीय दबाव आणून ठेकेदाराशी असलेली सलगी उघडकीस येऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान विहिरीच्या बांधकामाची साधी दुरु स्ती देखील न करता पडलेले बांधकाम काढून पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता. आज गुरु वारी (दि.२५) सकाळी अचानक संपूर्ण विहिरीचे बांधकामच कोसळून भुईसपाट झाले.यंदा पावसाने दडी मारल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पालिका प्रशासनाने देल्या पंधरा दिवसांपासून तब्बल दहा दिवसांआड शहराला पाणीपुरवठा करून पाणी कपातीचा निर्णय घेतला असतांना आज अचानक पाणी पुरवठा विहीरच कोसळलेल्या बांधकाम आणि मातीने भरून आल्याने आगामी काळात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. एकीकडे शासन शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी एवढा मोठा निधी खर्च करत असतांना दुसरीकडे मात्र पुढारी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळे लाखो रु पयांचा निधी पाण्यात जाऊन जनता मात्र तहानलेलीच आहे.सुलोचना चव्हाण नगराध्यक्ष असतांना नागरोत्थानच्या निधी मधून या विहिरीचे लाखो रु पये खर्चून काम करण्यात आले होते. या निकृष्ट कामाची तत्काळ चौकशी करून संबधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल.सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा.शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा नदी पात्रानजीक ९३ लाख रु पये खर्चून विहिरीचे काम केले होते. याबाबत आपण गेल्या तीन महिन्यांपूर्वीच तक्र ार केली होती. मात्र काही मंडळीने राजकीय सोयीसाठी हे प्रकरण दडपले होते. त्याच वेळी कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती, असे असतांना देखील त्याच ठेकेदाराला कामे दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर खटले भरावेत. अन्यथा आपण आंदोलनाचे हत्यार उपसु.मनोज सोनवणे, माजी नगरसेवक, सटाणा.