नाशिक : विवाहितेचा विविध कारणांवरून होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण भागात ‘दामिनी’ पथक धावणार आहे. या पथकाच्या स्वतंत्र वाहनांना मंगळवारी (दि.२६) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. निमित्त होते, जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘सखी’ मेळाव्याचे. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, योगा प्रशिक्षक प्रज्ञा पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, बचत गटाच्या आश्विनी बोरस्ते, अॅड. दीपाली खेडकर, पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपअधीक्षक अतुल झेंडे, अपर उपअधीक्षक विशाल गायकवाड, रोहिणी दराडे, दीपिका झेंडे, प्रियंका दराडे आदी उपस्थित होते. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा, येवला, सटाणा, कळवण, सिन्नर, मनमाड, चांदवड आदी तालुक्यांमधील गावागावांतून विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी दराडे म्हणाले, आधुनिक युगात पुरुषांच्या तुलनेत महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही; मात्र महिला, युवतींच्या बाबतीत घडणाºया गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनाही वाढल्या आहेत. यासाठी महिलांनी सक्षम होऊन त्याविरोधात जागरूकता दाखवून सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे व पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. यासाठी पूरक ठरणारा ‘आता बस्स...!’ हे अभियान ग्रामीण पोलीस दलाकडून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.असे आहे पथक; करा १०९१ वर संपर्क‘दामिनी’ पथकाकडून तत्काळ संकटसमयी महिलांना मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी एक मदतवाहिनी क्रमांक देण्यात आला आहे. ‘१०९१’ या क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी मदतीसाठी संबंधितांकडे पोहचेल, असे यावेळी सांगण्यात आले. पथकामध्ये एक महिला पोलीस अधिकारी व चार कर्मचाºयांची एका वाहनावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण सहा वाहने जिल्ह्याच्या रस्त्यावर धावणार आहेत. चार अधिकारी व २४ महिला कर्मचाºयांचे ‘दामिनी’ पथक आहे.
ग्रामीण महिलांच्या मदतीला धावणार ‘दामिनी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:18 AM