पांगरी : पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेया वर्षी प्रथमच जुलै महिन्यातच येथील बंधारे भरले असून, भोजापूर धरण अद्यापर्यंत भरले नसले तरी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागली असून त्यामुळे पांगरी व परिसरातील बंधारे तुडुंब भरले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला असून यामुळे या वर्षी सुद्धा पाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार आहे.एकादशीपासून पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाते की काय याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती परंतु पांगरी परिसरात मागील हफ्त्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले असून त्याच वेळी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने रब्बी पिकांना यांचा फयदा होऊन विहिरींना पाणी उतरणार असून त्यामुळे जनावरांचा चारा व पाणी प्रश्न सुटूण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे,आमदार व पाटबंधारे विभागातील कर्मचारी यांनी नियोजन करून 2016, 2017 व 2018 पांगरी येथे भोजपुरचे आवर्तन सोडून पांगरीच्या बंधाऱ्यात पाणी पोहोच होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे मागिल वर्षीही पिण्याच्या पाणीची टंचाई जाणवली नव्हती.पांगरी येथील वसंत बंधारा भरल्यास पिण्याचा पाणी प्रश्न बऱ्याच अंशी कमी होणार असल्याने, तसेच रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.चौकट:- जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागल्याने त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी सुखावला असल्याने, पांगरी-मऱ्हळ रस्त्यावरील पुलावर ग्रामपंचयात व ग्रामस्था तर्फे पाणायचे पूजन सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा निरगुडे, रमेश पांगारकर, रभाजी पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सविता निकम, शिवाजी कांडेकर, भाऊसाहेब निरगुडे, संदीप पगार, ज्ञानेश्वर पगार, सागर हसे, गणेश दळवी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.