नाशिक : महापालिकेच्या परवानगीशिवाय गोल्फ क्लब मैदानावर परस्पर गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारणाºयांना महापालिकेने दणका दिला असून, आज दीडशेहून अधिक गाळ्यांसाठी उभारलेले बांबूंच्या सांगाड्यांची मोडतोड प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. आता शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विक्री गाळे उभारण्यासाठी सोमवारी (दि.१४) लिलाव करण्यात येणार आहे. शहरात गणेशमूर्ती विक्री गाळे उभारण्यासाठी दरवर्षीच ताण वाढत असतो. शासकीय रुग्णालयाच्या भिंतीलगत गाळे उभारण्यास महापालिका विरोध करते आणि गोल्फ क्लबवर गाळे उभारण्यास परवानगी देते. त्यामुळे यंदा विक्रेत्यांमधील स्पर्धा वाढत असताना अनेकांनी महापालिकेच्या परवानगीची वाट न बघता गोल्फ क्लब मैदानावर स्टॉलसाठी बांबू ठोकण्यास सुरुवात केली. महापालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची लिलावाची प्रक्रिया झालेली नसतानाच राजकीय आशीर्वादाने हे गाळे उभारण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच विविध कर वसुली विभागाच्या सूचनेवरून अतिक्रमण विरोधी पथकाने मैदानात जाऊन तेथील स्टॉलची मोडतोड केली. सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल महापालिकेने हटविण्यात आले असून, आता सोमवारी (दि.१४) महापालिका ५७० गाळ्यांचा लिलाव करणार आहे.राजकीय कार्यकर्ते उतरणार लिलावातमहापालिकेच्या वतीने गाळे लिलावाची प्रक्रिया होण्याच्या आतच दरवर्षी काही राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांमार्फत गोल्फ क्लब मैदानावर गाळे उभारतात आणि सामान्य व्यावसायिकांना चढ्या भावाने देत असतात. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केल्याने आता ही राजकीय मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना लिलावात उतरविण्याची शक्यता आहे.
बेकायदा स्टॉल उभारणाºयांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:07 AM