शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

धोकादायक कठड्याला लावले बॅरिकेड्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:48 AM

गेल्या महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगतच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर नदीकाठालगत प्रशासनाने उभारलेल्या संरक्षक जाळ्या तसेच संरक्षित भिंत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नदीपात्राचा धोकादायक कथडा उघडा पडला आहे.

पंचवटी : गेल्या महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगतच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर नदीकाठालगत प्रशासनाने उभारलेल्या संरक्षक जाळ्या तसेच संरक्षित भिंत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नदीपात्राचा धोकादायक कथडा उघडा पडला आहे. सध्या या धोकादायक कठड्याभोवती पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तसेच नाकाबंदीसाठी रस्त्यावर उभे करण्यासाठी ठेवलेले लोखंडी बॅरिकेड संरक्षित भिंतीचे काम करत असल्याचे दिसून येते.घारपुरे घाटावर असलेल्या गोदावरी नदीपात्रालगत गेल्या काही दिवसांपासून लोखंडी बॅरिकेडिंग केलेले असले तरी अशोकस्तंभ जनावरांच्या दवाखान्याकडून वेगाने दुचाकी किंवा चारचाकी आल्यास आणि वाहनाचा वेग नियंत्रित न झाल्यास वाहन थेट नदीपात्रात कोसळून अपघाताची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून घारपुरे घाटानजीक नदीपात्रालगत अर्धवट तुटलेल्या भिंत तसेच संरक्षित जाळ्या असल्या तरी वाहनधारक तसेच परिसरात खेळणाºया लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अजब शक्कल लढवित पोलीस प्रशासनाच्या लोखंडी बॅरिकेडिंगचा आधार घेतला आहे. याठिकाणी जाळ्या लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.लोखंडी जाळ्यांची गरजघारपुरे घाटानजीकच्या नदीपात्रालगत काठाजवळ तीन ते चार लोखंडी बॅरिकेडिंग उभे केलेले असल्याचे बघायला मिळते. प्रशासनाने या ठिकाणच्या नदीकाठाची पाहणी करून तत्काळ पुन्हा नव्याने लोखंडी जाळ्यांची संरक्षित भिंत उभी करणे सध्या तरी गरजेचे ठरणार आहे.

टॅग्स :godavariगोदावरीWaterपाणी