उपनगर : तपोवन रस्त्यावरील शंकरनगर चौफुली व नंदिनी संगम घाटाकडे जाणाऱ्या टाकळी चौफुलीवर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, सदर धोकादायक वृक्ष काढण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. तपोवन रस्त्यावरील शंकरनगर चौफुली व नंदिनी संगम घाटाकडे जाणाऱ्या टाकळी चौफुली या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या दोन्ही चौफुल्यांवर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच बेशिस्त वाहनधारक भरधाव वेगाने वाहने हाकत असल्याने अपघातात आणखी भर पडत आहे. मनपाने रस्त्यामधील धोकादायक वृक्ष काढून या दोन्ही चौकांत गतिरोधक, रिफ्लेक्टर बसवून झेब्रा पट्टे मारण्याची गरज आहे. तसेच गतिरोधक टाकावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तसेच शहर वाहतूक शाखेने बेशिस्त भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी व वाहनधारकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
टाकळी चौक रस्त्यातील वृक्ष धोकादायक
By admin | Published: January 17, 2016 10:31 PM