देवगाव : उन्हाची तीव्रता अधिक असून, त्यातच दाट लग्नतिथीमुळे वºहाडी मंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रत्येक गावात पाहुण्यांची गर्दी पहावयास मिळत आहे.एका तिथीला ५-६ विवाहांची आमंत्रणे असतात. तसेच काही नातेवाईक उन्हाचे प्रमाण अधिक असल्याने मोबाइलद्वारे निमंत्रण देताना दिसत आहेत. अनेक आमंत्रणांमुळे कोणत्या विवाहाला हजेरी लावावी, असा प्रश्न सध्या पडताना दिसत आहे; मात्र नाते संबंधातील लग्नाला जावेच लागत असल्याने मोठी दमछाक होत आहे.एकत्र कुटुंबात जर ५-७ व्यक्ती असतील तर त्यांना वेगवेगळ्या विवाहांच्या ठिकाणी हजेरी लावावी लागते; मात्र कुटुंब प्रमुखाला प्रत्येक ठिकाणी हजेरी लावणे शक्य होताना दिसत नाही.गेल्या दोन महिन्यांपासून विवाहांचा धडाका सुरू झाला असून, एकाच दिवशी अनेक विवाह असल्याने वधू-वर पक्षाकडील मंडळींना त्रास सहन करावा लागत आहे.विवाहासाठी येणारे पाहुणे फक्त हजेरी लावून भोजन न करताच निघून जातात. त्यामुळे अन्नाचेही नुकसान होत आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याने पाण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.काही व्यावसायिकांनासुगीचे दिवसविवाहासाठी मंगल कार्यालय, आचारी, वाजंत्री, डीजे, घोडा, विवाहाचे बॅनर, मंडपवाले, कापड दुकान, वºहाडी मंडळीसाठी लागणारी वाहने यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. सकाळपासून उन्हाचा कडाका वाढत असला तरी भर दुपारी विवाह सोहळे पार पडत आहेत.
दाट लग्नतिथीमुळे वºहाडींची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:06 AM
उन्हाची तीव्रता अधिक असून, त्यातच दाट लग्नतिथीमुळे वºहाडी मंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रत्येक गावात पाहुण्यांची गर्दी पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देभर उन्हामध्ये लागताहेत लग्नेपाणीटंचाईचे विघ्न; अन्नही जाते वाया