खामखेडा : शिवारातील फांगदर आदिवासी वस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार जनावरे फस्त केल्याने नागरिकांनमघ्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खामखेडा गावच्या उत्तरेकडे भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभनगीपर्यत डोगर रांगा आहेत. साधारण वीस ते पंचवीस किलोमीटरच्या या डोंगर रांगा असून या डोगरात बिबट्याचे नेहमी वास्तव्य असते.अनेक वेळा डोगर पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या लोकांना बिबट्याचे दर्शन होते. या डोंगर रांगांमध्ये तिळवण किल्ला आहे. कील्लयाच्या दक्षिण बाजूस खामखेड्याचे फांगदर शिवार असून या शिवारात खामखेडा येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांच्या शेत जमीन असल्याने या फांगदर शिवारात हे आदिवासी भिल्ल समाजाचे लोक शेती करतात. ते तथेच वास्तव्य करून राहातात. काही शेतकºयांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, बकºया , मेंढ्या पाळल्या आहेत. पावसाळ्यात गावातील काही शेतकरी आपली जनावरे चारण्यासाठी त्याच्याकडे देतात. परंतु वस्तीपासून जवळच डोगर दºया असल्याने येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याने जनावरे चरण्यासाठी जवळ डोगरात गेले असता बिबट्या त्यांच्यावर झडप घालतो. बिबट्याने गेल्या आठ दिवसात गाय, वासरू,बोकड,मेंढी आदी चार जनावरे फस्त केली आहेत. आठ दिवसात यशवंत पुंजाराम यांची गाय, पोपट पुंजाराम यांचा बोकड, काशिनाथ वेडु यांची बकरी तर शांताराम धनगर यांची मेंढी बिबट्याने फस्त केल्याने तेथे वास्तव्य करण्याºया लोकांना रात्री बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरीकांकडून करण्यात येत आहे.
फागंदर शिवारात बिबट्याची दहशत : चार जनावरे केली फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 5:46 PM