मनमाड : पुणे-गोरखपूर ज्ञानगंगा एक्स्प्रेसमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात ४६ हजार रुपयांच्या रोकडसह अन्य ऐवज लांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मनमाडला दाखल गुन्हा नगर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.पुणे येथून गोरखपूरकडे जाणारी ज्ञानगंगा एक्स्प्रेस दौंड रेल्वे स्थानकावर थांबली असता ४ ते ५ प्रवाशी गाडीत बसले. धावत्या गाडीत त्यांनी प्रवाशाला शस्त्राचा धाक दाखवून गाडीतील शौचालयात नेत मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लांबविला. नगर रेल्वे स्थानकानजीक गाडीची साखळी ओढून दरोडेखोर पसार झाले. या घटनेत ४६ हजार रूपये रोख व पाच मोबाईल असा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटना नगर हद्दीत घडल्याने हा गुन्हा नगर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.(वार्ताहर)दरम्यान धावत्या गाडीतील चोरी व लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशी वर्गामधे घबराट निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
ज्ञानगंगा एक्सप्रेस दरोड्यात ४६ हजारांची लूट
By admin | Published: October 15, 2016 2:55 AM