सटाणा : शहर व तालुक्यात डेंग्यू व चिकुन गुन्या या साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, सदृश रु ग्णांमध्ये वाढ होत असून, उपाचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज तीनशेहून अधिक रु ग्ण आढळून येत आहेत. या आजाराचे निदान शासकीय रुग्णालयांमध्ये होत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रु ग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. आरोग्य विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवून डेंग्यू व चिकुन गुन्याचा फैलाव रोखावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.सटाणा शहरासह तालुक्यात पाण्याची डबकी साचल्याने डासांची पैदास मोठ्याप्रमाणात वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सटाणा, नामपूर, जायखेडा, मुल्हेर आदि भागात तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सटाणा व नामपूर ग्रामीण रु ग्णालय, मुल्हेर व जायखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज तीनशेहून अधिक रु ग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. या रु ग्णांमध्ये सुमारे चाळीस टक्के रुग्ण डेंग्यू व चिकुन गुन्यासदृश असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यामुळे नामपूर व सटाणा येथील खासगी रु ग्णालयांमध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज सटाण्यात फरीन रिफक खान (२०), रा. काळू नानाजी नगर या तरु णीला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(वार्ताहर)तर नामपूर येथे दहा रु ग्ण आढळले असून त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.
सटाण्यात डेंग्यूच्या रु ग्णांमध्ये वाढ
By admin | Published: September 14, 2016 10:32 PM