शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

डेंग्यूचा डंख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:07 PM

आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे दुर्दैवी म्हणायला हवे.

आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे दुर्दैवी म्हणायला हवे.नाशकात भीती वाटावी अशा प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होताना दिसत आहे. चालू वर्षाच्या प्रारंभीच्या काही महिन्यांमध्ये प्रतिमाह अवघी २ ते ६ इतकीच राहिलेली या आजाराच्या रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांत थेट शंभरावर पोहोचली आहे. यातही आॅक्टोबरमध्ये या वर्षातील सर्वाधिक १४३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारीपासून आजपर्यंतचा आढावा घेता या चालू वर्षात एक हजारावर संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील सुमारे चारशे जणांना डेंग्यू झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी खरे तर चिंताजनक आहे. विशेषत: नाशिक पूर्व व सिडको-सातपूरमधले डेंग्यूचे प्रमाण अधिक असून, सिडकोत तर एकाच परिसरात पन्नासपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, कारण तेथील एका बंद पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची कुचराई उघड होणारी आहे. म्हणायला कागदोपत्री तिसेक धूर फवारणी यंत्रांद्वारे धुरळणी केली जाते. परंतु ती पुरेशी आहे का व उपयोगी ठरते आहे का याचा आढावाच घेतला जाताना दिसत नाही. आजही अनेक भागातून त्याबाबतच्या तक्रारी येताना दिसतात. धूर फवारणी करणारे कर्मचारी कामचुकारपणा करतात, त्यांच्यावर कारवाईची मागणीही होते; पण त्याबाबतही काही होताना दिसत नाही. त्याउलट महापालिकेची यंत्रणा गेल्यावर्षीपेक्षा यंदा स्थिती कशी आटोक्यात आहे, हे सांगण्यात धन्यता मानताना दिसते. गेल्यावर्षी आॅक्टोबरपर्यंत सातशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले होते, यंदा ती संख्या चारशेच आहे. शिवाय गेल्यावर्षी चारजण मृत्युमुखी पडले होते, यंदा तसे काही घडलेले नाही, असे म्हणून यंत्रणा याबाबतीतले गांभीर्य बाळगताना दिसत नाही. दुपारी उन्हाचा चटका बसतो व सायंकाळनंतर थंडी वाजते, या वातावरणात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढते, असे कारण देऊनही बचावण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा जबाबदारीपासून बचावाची कारणे शोधण्यापेक्षा ती निभावण्याची भूमिका महापालिकेतील आरोग्य विभागाने घेणे गरजेचे आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूबाधितांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कागदोपत्री समाधानाची मानली जात असली तरी, ते समाधान समस्येकडे दुर्लक्ष घडविणारे तसेच त्यासंबंधाने होत असलेल्या कुचराईला निमंत्रण देणारेही ठरते. आकडा कमी म्हणून अशा प्रश्नांकडे पाठ फिरवता येणार नाही. दुर्दैव असे की, महापालिकेतील आरोग्य विभाग नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेत गुरफटलेला आहे. त्यामुळे यंत्रणा बेफिकिरीने काम करताना दिसते. डेंग्यूप्रमाणेच कावीळ व मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दूषित पाणीपुरवठ्यातून ही बिमारी ओढवते आहे. पण, त्याहीबाबत अनास्थेचीच स्थिती आहे. नागरिक स्वत:च्या आरोग्याबद्दल तितकेसे सजग नाहीत हा भाग आहेच; परंतु आरोग्यविषयक समस्यांना बºयाचअंशी महापालिकेच्या यंत्रणांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरताना दिसून येते. म्हणूनच याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जाणे गरजेचे आहे.