शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

अध्यक्षपदी दराडे; उपाध्यक्ष सुहास कांदे

By admin | Published: June 04, 2015 12:26 AM

जिल्हा बॅँक : नाट्यमय घडामोडींनंतर बिनविरोध निवड

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी सुहास कांदे यांची बिनविरोध निवड झाली. अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ही बिनविरोध निवड झाली. दराडेंच्या रूपाने बॅँकेवर राष्ट्रवादीचा, तर कांदेंच्या रूपाने सेनेचा झेंडा फडकला आहे.येथील जिल्हा बॅँकेच्या शरद पवार सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळीच ११ वाजता कोकाटे-भोसले गटाकडून माणिकराव कोकाटे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला. तर हिरे गटाकडून आमदार अनिल कदम यांनी फॉर्म भरला. उपाध्यक्षपदासाठी हिरे गटाकडून अ‍ॅड. संदीप गुळवे फॉर्म भरणार होते; मात्र सर्वानुमते सुहास कांदे यांचे नाव पुढे आल्याने गुळवे यांनी फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. सभागृहात ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी नरेंद्र दराडे यांनी फॉर्म भरला. त्यानंतर नियोजित माघारीच्या वेळी दराडे वगळता सर्वांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी सुहास कांदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर लगेचच संचालक केदा अहेर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड ही एक वर्षासाठी असल्याचा ठराव मांडला, तर त्यास गणपतराव पाटील यांनी अनुमोेदन दिले. दुसरे संचालक शिवाजी चुंभळे यांनी ही निवड एक वर्षासाठीच करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ माळवे यांनी नवीन घटना दुरुस्तीनुसार ही निवड पाच वर्षांसाठी असून, अध्यक्ष व उपाध्यक्षांना राजीनामा देणे वैयक्तिक असून, नवीन निवडणूक घेण्याचे अधिकार सहकार प्राधिकरणाला असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अन्य सर्व संचालकांनी अभिनंदन केले. यावेळी अन्य संचालक आमदार सीमा हिरे, आमदार जे. पी. गावित, माजी आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, अद्वय हिरे, परवेज कोकणी, नामदेव हलकंदर, डॉ. शोभा बच्छाव, सचिन सावंत, धनंजय पवार, किशोर दराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)