येवला : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाल्याने येवला शहर व तालुक्यात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत दराडे यांचे जोरदार स्वागत केले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील विंचूर चौफुलीवर फटाक्यांची आतषबाजी करत दराडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोलताशा व हलकडीच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. कापड बाजार, सराफ बाजार मार्गे काढण्यात आलेली मिरवणुकीचा टिळक मैदानात समारोप झाला. यावेळी मिरवणूक रथात नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह येमको अध्यक्ष पंकज पारख, ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील विराजमान होते. मिरवणुकीत संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक डॉ. सुधीर जाधव, अरु ण काळे, कुणाल दराडे, सुरज पटणी, खरेदी विक्र ी संघाचे संचालक दत्तात्रय वैद्य, अजय जैन, प्रमोद सस्कर, दीपक लोणारी, जगन मुंढे, रतन बोरणारे, वाल्मीक गोरे, भास्कर कोंढरे, मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, नगरसेवक गणेश शिंदे, राजेंद्र लोणारी, दयानंद जावळे, पंचायत समिती सदस्य मंगेश भगत, कांतीलाल साळवे, विठ्ठलराव आठशेरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. मिरवणुकीचा समारोप टिळक मैदानात झाला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दराडे यांनी पुष्पहार अर्पण केला.
येवल्यात दराडे यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:16 AM