मालेगाव : भारतातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्र (ईव्हीएम) हटवून देशाला वाचवावे तसेच झारखंड येथील तरबेज अन्सारी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांच्या नेतृत्वाखाली येथील पदाधिकाºयांनी आंदोलन केले.भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. पंतप्रधान निवडीसाठी देखील एका मताचा अधिकार देण्यात आला आहे. जनतेचा निवडणूक प्रक्रियेवर कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम हटवून देश वाचविणे गरजेचे आहे. झारखंड मधील तरबेज अन्सारी यांच्या मारेकºयांना शिक्षा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आढाव, रमाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मंगला आढाव, आनंद कापडे, नितीन बोराडे, गुलाब पगारे, किरण पगारे, दीपक पानपाटील, श्रीराम सोनवणे, प्रेमकुमार निकम, सुनिल अहिरे, सुनिल चौधरी, रविराज थोरात, बापु अहिरे, रविराज जगताप, राकेश देवरे, गणेश चौधरी, संजय वाघ, देविदास निकम, विजय भालेराव, किरण मोरे, आनंद यशोद, किरण गरुड आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मालेगावी पीआरपीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 7:09 PM
भारतातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान यंत्र (ईव्हीएम) हटवून देशाला वाचवावे तसेच झारखंड येथील तरबेज अन्सारी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन