दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्या कमी होत्या. शाळेत येणारे अतिथी, पालक, ग्रामस्थ व रोज येणारे शिक्षक यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्याÞ नव्हत्या. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असल्याने त्याप्रमाणात शिक्षक वर्ग आहे. शाळा व्यवस्थापन समितीने ही समस्या हेरून सदस्यांकडून वर्गणी गोळा केली व शाळा कार्यालयास अकरा खुर्च्या भेट स्वरुपात दिल्या. अध्यक्ष ज्ञानेश्वर गांगुर्डे, सचिव मुख्याध्यापक सूर्यवंशी, जनार्र्दन देवरे, एकनाथ पगार, समाधान गांगुर्डे, रावसाहेब देवरे, विक्र म देवरे, एकनाथ गांगुर्डे, भाऊसाहेब पगार, अर्जुन गव्हाणे, संदीप गांगुर्डे, पंडित गरूड, रोहिदास पिंपळे, संजय गांगुर्डे यांनी वर्गणी गोळा करून आसनव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी ताट पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरेगाव जिल्हा परिषद शाळेला खर्च्या भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 7:25 PM
दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्या कमी होत्या. शाळेत येणारे अतिथी, पालक, ग्रामस्थ व रोज येणारे शिक्षक यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्याÞ नव्हत्या.
ठळक मुद्देशाळेच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्या कमी होत्या.वर्गणी गोळा केली व शाळा कार्यालयास अकरा खुर्च्या भेट