शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

By admin | Published: November 13, 2016 10:27 PM

दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

 निफाड : तालुक्यातील दारणासांगवी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जर्सी गोऱ्हा ठार झाल्याची घटना घडली आहे. दारणासांगवी येथे सुनील कारभारी साळवे हे वस्ती करून राहतात. त्यांच्या घराच्या मागे जनावरे बांधण्यासाठी गोठा आहे. त्यात गाय, बैल, गोऱ्हा अशी जनावरे बांधलेली होती. रविवारी पहाटे या गोठ्याच्या जवळ असलेल्या उसातून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि ३ ते ४ वर्ष वयाच्या जर्सी गोऱ्ह्यावर हल्ला करून त्यास उसात ओढून नेले. सकाळी गोऱ्हा गोठ्यात नसल्याचे साळवे यांच्या लक्षात आले. अधिक शोध घेतला असता काही अंतरावर उसात गोऱ्हा मृत अवस्थेत आढळून आला. येवला विभागाचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक विजय लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.रविवारी ज्या साळवे यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली त्या ठिकाणापासून अवघ्या ५०० ते १००० फूट अंतरावर वनविभागाने गेल्या एक महिन्यात चक्क तीन बिबटे पिंजऱ्यात जेरबंद केले आहेत. ८ आॅक्टोबरला पहिला, २० आॅक्टोबरला दुसरा आणि ७ नोव्हेंबरला तिसरा बिबट्या दारणासांगवी येथे पिंजऱ्यात जेरबंद झाले होते. तरीही चौथा बिबट्या अवघ्या सात दिवसांनी म्हणजे १४ नोव्हेंबरला पुन्हा दारणासांगवी परिसरात निघतो आणि छोट्या जनावरांवर हल्ला करतो यावरून बिबट्यांची संख्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अशी चर्चा होत आहे. (वार्ताहर)