निफाड : तालुक्यातील रासाका अर्थात रानवड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील व्यावसायिक गत पंधरा दिवसां पासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात चाचपडत व्यवसाय करत असून यांची खंत अधिकारी वर्ग तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधी ना नसल्याचे चित्र दिसत आहे.रासाका चार वर्षांपासून बंद आहे. त्यात वीजपुरवठा महावितरणने चार वर्षापासून खंडीत केला असल्याने सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. परंतु टान्सफार्मर खराब झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक, पीठाची चक्की, इस्त्री, पंचर, टेलर, सलून, किराणा, हॉटेल व्यावसायिक आधीच कोरोनाच्या महामारीच्या लॉकडाउन मुळे व्यवसाय दोन ते तीन महिने बंद होते. आता हे व्यवसाय काही प्रमाणात सुरु झाल्याने काही प्रमाणात आशावादी असलेल्या सर्वच व्यवसायिकांना आता अंधारांत बसावे लागत आहे. परिसरात विजेचा पुरवठा खंडित झाल्याने या अंधाराचा फायदा घेऊन काही चोरटे फिरत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. मात्र व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून तातडीने सदर ट्रन्सफार्मर बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.प्रतिक्रि या....पंधरा दिवस झाले तरी महावितरण लागले जाग येत नाही. आम्ही व्यवसायिक आधीच मेटाकुटीला आलो आहे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून उजेड द्यावा.- संदीप पवार, हॉटेल व्यावसायिक.
रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथानरामुळे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 7:56 PM
निफाड : तालुक्यातील रासाका अर्थात रानवड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील व्यावसायिक गत पंधरा दिवसां पासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात चाचपडत व्यवसाय करत असून यांची खंत अधिकारी वर्ग तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधी ना नसल्याचे चित्र दिसत आहे.
ठळक मुद्देकाकासाहेब नगर : वीजपुरवठा खंडित असूनसुद्धा व्यावसायिकांना भाडे आकारावे लागणार