पंचवटी : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हायमास्ट तसेच अन्य पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने सायंकाळच्या सुमाराला बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. बंद पथदीपांबाबत बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतरदेखील बाजार समितीचे दुर्लक्ष झाल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य असल्याने शेतकऱ्यांना लुटण्याच्या किंवा भुरट्या चोरीच्या घटना घडण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सायंकाळी बाजार समितीच्या आवारात सर्वत्र अंधार असल्याने शेतकऱ्यांना या रस्त्यानेच मार्गक्र मण करावे लागत आहे. बाजार समितीत उद्भवणाऱ्या समस्या तसेच अडचणी सोडविण्यासाठी बाजार समिती लक्ष केंद्रित करते असेल सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून संपून बाजार समितीतील पथदीप बंद असले तरी त्याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने व्यापारी, हमाल तसेच शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बंद पथदीपांबाबत बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांचेही दुर्लक्ष झाल्याचे बाजार समिती घटकांनी बोलून दाखविले. (वार्ताहर)
बाजार समितीत अंधाराचे साम्राज्य
By admin | Published: August 04, 2016 1:40 AM