संगमेश्वर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ला रुजवा, किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहिती मिळावी व त्यातुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगमेश्वरातील म. ज्योतीबा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिपावली पर्वात मातीचे किल्ले बनवून आगळा वेगळा उपक्रम राबविला.फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विकास मंडळ यांच्या कल्पनेतुन आज गड, किल्ले बनविण्याची कार्यशाळा झाली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून २७ किल्ल्याच्या प्रतिकृती बनवून दिपावली पर्वात एक वेगळा अनुभव घेतला.शाळेचे शिक्षक श्रेयश वाघ, लिला जगताप, वंदना शिंदे, संगिता जाधव, योगिता देवरे, अंकुश कुवर, महेश सोनजे, चेतन वाघ, किर्ती पगारे, राजेंद्र अहिरे, सुवर्णा अहिरे, सविता बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना किल्ले बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.मातीचे किल्ले बनवितानाच विद्यार्थ्यांना पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा आदि संदेश देणारे फलक लावले होते. यावेळी संस्थेचे सचिव अॅड. जे. आर. अहिरे, सदस्य अशोक फराटे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक मंडळ यांनी मानले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बनविले गड-किल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:31 PM
शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ला रुजवा, किल्ल्यांचे स्वराज्यातील योगदानाची माहिती मिळावी व त्यातुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संगमेश्वरातील म. ज्योतीबा फुले शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिपावली पर्वात मातीचे किल्ले बनवून आगळा वेगळा उपक्रम राबविला.
ठळक मुद्देमालेगाव : सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचा उपक्रम