सटाणा : तालुक्यातील औरंगाबाद-आहवा राज्यमार्गावरील जायखेडा ते आसखेडा या रस्त्याचे काम एक ना अनेक तक्र ारींमुळे रखडले होते. पाऊस सुरू असताना शनिवारपासून या रस्त्याच्या साइडपट्ट्यांचे डांबरीकरण सुरू केल्याने हे काम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पावसाळ्यात ठेकेदाराकडून डांबरीकरण केले जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे .औरंगाबाद-आहवा राज्य मार्गावरील चिंचलीघट ते मालेगाव या रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने टप्प्या टप्प्याने हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मार्च २०१४ मध्ये केंद्राच्या राखीव निधी मधून जायखेडा-आसखेडा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दीड कोटी रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला होता .मात्र संबधित ठेकेदाराने कमी दराने निविदा घेतल्याने सुरु वातीपासून निकृष्ट दर्जाची खडी , डांबर या कामासाठी वापरल्याने साईडपट्ट्या पूर्णपणे खचून गेल्याने गावकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे हे काम बंद पडले होते. गेल्या शुक्र वार पासून हे काम पुन्हा सुरु करण्यात आले असून साईड पट्ट्यांवर खडी टाकून रोलिंगचे काम सुरु करण्यात आले . मात्र शनिवारी दुपारी अचानक याच साईड पट्ट्यांवर डांबर टाकून ग्रीड टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हा मार्ग गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परंतु पावसाळ्यात सुरु असलेल्या या कामामुळे साईड पट्ट्या खराब होऊन अपघाताला निमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची चौकशी करून दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी पावसाळ्या- नंतरच या कामाला सुरु वात करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
ऐन पावसाळ्यात डांबरीकरण
By admin | Published: August 01, 2016 12:25 AM