लोकमत न्यूज नेटवर्कभगूर : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येऊन खळखळून वाहणारी दारणा नदी यावर्षी चक्क कोरडी पडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र दिसत आहे .दरवर्षीप्रमाणे जुलै महिन्यात पाऊस पडतो आणि भगूरची दारणा नदी खळखळून वाहते. काठावरील राहुरी, दोनवाडे, लहवित, नानेगावसह बहुतांश गावातील शेतकरी पिकपेरा करतात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटतो. मात्र जून महिन्यात थोडाफार पाऊस पडला तर जुलै महिना कोरडा चालल्याने दारणा नदीचे पाणी आटले असून, नदीच्या पात्रात असलेले खड्ड्यांमध्ये पाणी दिसते आहे. यामुळे पाणीपुरवठा संस्था चिंतेत पडल्या आहेत. अजून पंधरा दिवस पाऊस न पडल्यास शेतकरी, पाणीपुरवठा विभाग यांची चिंता वाढणार आहे.दारणा नदी पात्रात सर्वत्र गवत उगवले आहे. यामुळे नदीपात्र अरुंद झाल्यासारखे दिसते. पाणी कमी गवत मोठ्या प्रमाणात आल्याने त्याची साफसफाई करून गवत काढून बाजूचा गाळ उपसून नदीपात्राची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ऐन पावसाळ्यात दारणा नदी कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:23 PM
भगूर : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येऊन खळखळून वाहणारी दारणा नदी यावर्षी चक्क कोरडी पडल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र दिसत आहे .
ठळक मुद्देशेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा : पाणी योजना अडचणीत येण्याची शक्यता