अशोक बिदरी-
मनमाड ( नाशिक ) :
शिवसेना दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावरच होत असतो. ही शिवसेना प्रमुखांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल अशी रोखठोक भूमिका विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाला मुंबईत दसरा घेण्यास परवानगी नाकारली त्याचा दानवे यांनी समाचार घेतला. दानवे आज मनमाड दौऱ्यावर असताना बोलत यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या एकेरी टिकेचाही समाचार घेतला.ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली ही नारायण राणे यांची नामखराबी असल्याचे दानवे म्हणाले.तसेच अमित शाहांसमोर उद्धव ठाकरे दिवा असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेचा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनमाड येथे खरपूस समाचार घेतला.एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळे यांना सांगण्याची गरज नाही.अमित शाह जर सूर्य आहे तर उद्धव ठाकरे यांनी दिलेले एक महिन्यात निवडणुका घेण्याचे दिलेले आव्हान त्यांनी स्वीकारावे. निवडणुका घेण्यासाठी सरकार त्यापासून पळ काढतेय.उद्धव ठाकरे यांचे आव्हान पेलू शकत नाही म्हणून असे बेताल बोलत आहे.राज्यातील भाजप दिवे विझलेले आहे.