येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रंजन थोरवीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. येथील सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. निर्धारित वेळेत सरपंचपद पदासाठी दताराम डोमाडे, तर उपसरपंचपदासाठी सुमन कापडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. डोमाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुभाष बर्के, तर कापडी यांच्या अर्जावर विठ्ठल मेंगाळ यांची स्वाक्षरी होती. दोन्हीही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने अध्यासी अधिकाऱ्यांनी सरपंचपदी डोमाडे, तर उपसरपंचपदी कापडी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग डोमाडे, सुभाष बर्के, विठ्ठल मेंगाळ, उज्ज्वला बर्के, कविता पवार, काशीनाथ डोमाडे, प्रकाश कर्डक, ग्रामसेवक पगारे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच दत्ताराम डोमाडे व उपसरपंच सुमन कापडी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
फोटो - २५ देशवंडी सरपंच
देशवंडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्ताराम डोमाडे व उपसरपंचपदी सुमन कापडी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी श्रीरंग डोमाडे, सुभाष बर्के, विठ्ठल मेंगाळ, उज्ज्वला बर्के, कविता पवार, काशीनाथ डोमाडे, भारती शेळके, प्रकाश कर्डक, संजय शेळके, आदी उपस्थित होते.