नाशिक : शेतीक्षेतात्रात प्रतिकूल स्थितीचा सामना करून प्रयोगशीलता आणि कर्तव्यनिष्ठेच्या वेगवेगळ्या मार्गाने विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना आयसीएतर्फे (इंडियन चेंबर आॅफ अॅग्रीकल्चर) दौलतराव कडलग प्रेरणा पुरस्कार-२०१७ ने गौरविण्यात आले. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून आयसीएची कार्यपद्धती, शेतकरी, बाजार समिती, प्रशासन स्तरावर चालणाऱ्या कामकाज याविषयी तसेच शेतकऱ्यांना शेती करताना मार्गदर्शन गोष्टींचे ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे शुक्रवारी (दि.२१) कृषी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या अकरा पुरस्कारार्थींना दौलतराव कडलग पुरस्कार २०१७ प्रदान करण्यात आले.दरम्यान, पंजाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीत मनोज दंडगव्हाळ यांनी, तर शेखर गायकवाड यांच्या अनुपस्थितीत राजेंद्र सोनवणे यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रास्ताविक साहेबराव क्षीरसागर यांनी केला, तर प्र्रतीक्षा शिंदे व कवी प्रा. संदीप जगताप यांनी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत भरली. प्रा. जगताप यांनी कार्यक्रमादरम्यान सादर केलेल्या नोटाबंदी, काळी माती, शेतकरी आत्महत्त्या आदि विषयांवरील कवितांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यावेळी आयसीएचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ जयराम पूरकर, व्यंकटेश जोशी, नाशिक सीए असोसिएशनचे अध्यक्ष विकास हासे, महापालिका नगरसेवक विलास शिंदे, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दौलतराव कडलग प्रेरणा पुरस्कारांचे वितरण
By admin | Published: April 23, 2017 2:20 AM