शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
5
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
6
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
7
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
8
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
9
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
10
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
11
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
12
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
13
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
15
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
16
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
17
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

दावचवाडीच्या ‘त्या’ विधवेला अखेर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 9:25 PM

ओझर : पिंपळगाव बाजार समितीतील मयत कर्मचारी पारस लखिचंद कोचर यांचा सहाव्या वेतन आयोगातील दुसऱ्या हप्त्यातील फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. अखेर सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शर्मिला कोचर यांना न्याय मिळाला असून, मूळ रक्कम अधिक व्याज असा एकूण रकमेचा धनादेश त्यांना सुपुर्द करण्यात आला.

ओझर : पिंपळगाव बाजार समितीतील मयत कर्मचारी पारस लखिचंद कोचर यांचा सहाव्या वेतन आयोगातील दुसऱ्या हप्त्यातील फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. अखेर सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शर्मिला कोचर यांना न्याय मिळाला असून, मूळ रक्कम अधिक व्याज असा एकूण रकमेचा धनादेश त्यांना सुपुर्द करण्यात आला.सहाव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जेव्हा वर्ग झाली तेव्हा पारस कोचर हे हयात होते, तर दुसºया हप्त्याची रक्कम वर्ग होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरी वारसदार शर्मिला कोचर यांना सदर रक्कम प्राप्त न झाल्याने माजी संचालक गोकुळ गिते यांनी ही अफरातफर उघडकीस आणली होती. बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी सदरची रक्कम मधुकर तेलंगे यांच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यावर वर्ग करून परस्पर लाटल्याचा आरोप शर्मिला कोचर यांनी केला होता. त्यांनी तसा तक्रार अर्ज सभापती, तालुका सहनिबंधक व पोलीस निरीक्षक पिंपळगाव यांना दिला होता.या सर्वसंबंधी ‘लोकमत’ने एक आठवडा या प्रकरणाचा बातमीद्वारे पाठपुरावा केला होता. अखेर आमदार दिलीप बनकर यांनी याबाबत तातडीची बैठक घेत चौकशीचे आदेश दिले होते. यात सदर बाब उघडकीस आली. त्यांनी गोकुळ गिते व कोचर परिवारातील काही सदस्यांना बोलवत मध्यस्थी केली व अखेर शर्मिलाकोचर यांना व्याजासकट रक्कम मिळाली.--------------------------------...अन् अश्रू अनावररोजंदारीवर काम करणाºया शर्मिला कोचर यांची परिस्थिती बेताची आहे. त्यांना जेव्हा सदर प्रकरण समजले तेव्हा त्यांनी बाजार समिती कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु बनकर यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्या संसाराला मोठा हातभार लागणार आहे. धनादेश घेऊन त्या बाजार समिती मुख्यालयातून जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना गोकुळ गिते, अजय गवळी आदींनी सावरत आधार दिला.-------------------------पिंपळगाव बाजार समितीचा कारभार पारदर्शी आहे. पारस कोचर यांच्या फरक रक्कमेबाबत तोडगा काढला असला तरी अर्जित रजांबाबतदेखील बाळू उगले, पी. एस. जाधव व सीताराम महाजन यांच्या हक्काची रक्कम लवकरच दिली जाईल. विशेष लेखापरीक्षक राजाराम बस्ते यांच्यामार्फत सर्वच बाबींची अंतरिम चौकशी सुरू केली आहे. लवकरच त्यांचा अहवाल प्राप्त होईल. अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अजूनही कुणाचे काही देणे-घेणे असल्यास तत्काळ अर्ज द्यावे.- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती

टॅग्स :Nashikनाशिक