सटाणा : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी शासकीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शासकीय यंत्रणेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर आमदार बोरसे यांनी सटाणा व नामपूर येथे आज गुरु वार, दि.१९ वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची तहसीलदार जितेंद्र इंगळे- पाटील, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, पालिकेच्या मुख्य अधिकारी हेमलता डगळे-हिले, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी आमदार बोरसे बोलत होते. आपल्या गावात अथवा आपल्या घरी परदेशातून आलेल्या नातेवाइकांची माहिती तत्काळ ग्रामसेवक, पोलीसपाटील अथवा तलाठ्याला कळविण्यात यावी. यामुळे त्यांची तत्काळ तपासणी करून वेळेवर उपचार करून त्याचा होणारा फैलाव रोखता येईल, असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. यावेळी बहुतांश ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, कर्मचाऱ्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याचे आमदार बोरसे यांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांचीदेखील मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.बागलाणमध्ये १४ जणांचे परदेशातून आगमनतालुक्यात नेदरलँड, दुबई, लंडन आदी भागांतून तब्बल १४ जण परदेशांतून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या चौदा जणांना आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनाबाबत कोणतेही लक्षण दिसून आले नसल्याचे स्पष्ट केले. तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तालुक्यातील नामपूर, सटाणा, जायखेडा, लखमापूर, तळवाडे दिगर, साल्हेर, मुल्हेर, ताहाराबाद, निताणे, ठेंगोडा, डांगसौंदाणे आदी गावांतील आठवडे बाजारांवर बंदी आणली असून, तशा ग्रामपंचायत प्रशासनाला नोटीसदेखील बजावल्याचे सांगितले. तसेच अंतापूर येथे दावल मलिक बाबा यात्रोत्सव, मांगीतुंगी देवस्थान दर्शनदेखील बंद करण्यात आले आहेत.
अंतापूरला दावल मलिक बाबा यात्रोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:13 PM
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी शासकीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील तसेच शासकीय यंत्रणेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.
ठळक मुद्देसटाणा : मांगीतुंगी देवस्थानाचे प्रवेशद्वारही झाले बंद