नाशिक : शहरात हळुवारपणे थंडीचे आगमन झाले असून, रात्री तसेच पहाटे गुलाबी थंडी नाशिककरांना जाणवू लागली आहे. कमाल तपमानाचा पारा तिशीच्या पुढे असल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता अद्याप जाणवत नाही; मात्र किमान तपमानाचा पारा घसरू लागला असून, सोमवारी (दि.२९) १३.३ अंशांपर्यंत पारा खाली आला. यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे थंडीचे उशिरा व हळुवारपणे आगमन झाले आहे. कमाल तपमान अद्यापही तिशीच्यापुढे असल्यामुळे थंडीचा फारसा प्रभाव वातावरणात जाणवत नाही. सकाळी दहा वाजेनंतर उन्हाची तीव्रता नाशिककरांना दिवसभर अजूनही अनुभवयास येत आहे. आॅक्टोबरअखेर थंडीचे आगमन झाल्याने पुढील महिन्यात किमान तपमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पहाटे जाणवू लागली गुलाबी थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 1:10 AM