शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

नांदुरमधमेश्वरमधील मृतसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 6:26 PM

लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे्र पाणीटंचाई : १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन कुचकामी

लासलगाव : लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदुरमध्मेश्वर धरणात असलेला पाण्याचा मृतसाठा देखील संपल्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आठ दिवसाआड पाणीपुरवठा बंद पडला असुन त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणीजिल्हाधिकारी मांढरे व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे.कडक उन्हाळा सुरू असल्याने बोअरवेल्स आटल्याने तसेच लासलगाव विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा संपुष्टात आल्याने लाभार्थी गावांना सात ते आठ दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता.लासलगाव विंचूर या दोन प्रमुख गावांसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना नांदूरमधमेश्वर बंधार्यावरून करण्यात आलेली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई लाभार्थी गावांना जाणवू लागली आहे नांदूर मधमेश्वर बंधार्यातील पाणी साठा आता संपुष्टात आलेला असल्याने पाणीपुरवठा समितीच्या वतीने बंधाºयातील मोटारी पुढे हलविण्यात आल्या असून पाणीसाठा संपुष्टात आल्याने सात ते आठ दिवस आड लाभार्थी गावांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत आहे.योजनेच्या वारंवार फुटणाºया पाईपलाईनमुळे परिसराला विनाकारण सलग काही दिवस नळांना पाणी देता येत नाही. आता तर नांदुरमध्मेश्वर धरणात पाणीच नाही. परंतु ज्यावेळी मुबलक पाणी असते तरीही नाहक टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. . या विनाकारण टंचाईच्या अवकळा कमी होण्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक याच्याकडे सदर योजनांची पाईपलाईन गळती दुरु स्तीसाठी लासलगाव ग्रामपंचायतीने दुरु स्ती प्रस्ताव सादर केलेला आहे परंतु सुस्त प्रशासन प्रस्तावास मान्यता देऊन निधी उपलब्ध करु न देत नसल्याचा आरोप पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी केला आहे.लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना ही सन २०१० पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून समतिीस हस्तांतरित करण्यात आली. सादर योजनांची पाईपलाईन १५ ते २० वर्षा पूर्वी टाकण्यात आलेली होती ती अतिशय जीर्ण व खराब झालेली असून सदर पाईप लाईन हि कायम फुटत असते. लासलगाव पाणी पुरवठा समितीस सदरच्या पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी फारमोठ्या प्रमाणावर खर्च येतो लोखंडी पाईपलाईन असल्याने जे. सी. बी. द्वारे खोदाई करून वेल्डीग मशीनने गळती काढावी लागते. गळती काढण्याकरिता पूर्ण पाईपलाईन हि रिकामी करावी लागते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यव होतो गळती काढले नंतर पुनश्च पाईप लाईन भरण्यासाठी पाच ते सहा तास लागतात त्यामुळे विनाकारण वीज जळते त्यामुळे विनाकारण वीज बिलातही वाढ होते एवढा भुर्दंड सोळा गाव पाणी पुरवठा योजना समिती सहन करते गळती मुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करणे अशक्य होते महिला वर्गामध्ये ग्रामपंचायत प्रशासना बद्दल असंतोष निर्माण होतो यामध्ये ग्रामपंचायतीचा काही एक दोष नसतांना विज पुरवठा खंडीत होत असल्याने व पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने गेली दिवस विस्कळीत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई