खामखेडा : सुळे डावा कालवा सध्या पूर्ण क्षमतेने वाहत असून, या कालव्यात कळवण तालुक्यातील पश्चिम भागातून अनोळखी शेतकऱ्याची गाय पाटात पडून मृत अवस्थेत वाहत चाचेर व पिळकोस, ता. कळवण शिवारापर्यंत येऊन पाटात आडवी झाल्याने कालव्याच्या पाण्याला अडचण ठरत होती. हे पाहून खामखेडा येथील माजी सरपंचांनी स्वत: पुढाकार घेत कालव्यातून ती गाय बाजूला केल्याने पाणी सुरळीत वाहू लागले.
गाय पाटात आडवी झाल्याने कालवा मोठ्या प्रमाणावर पाठीमागे एखाद्या किमीपर्यंत फुलला होता. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सायंकाळी मृतावस्थेतील गाय पाहिली. मात्र गाय फुगल्याने ती दुर्गंधी पसरू लागली होती. पिळकोस, चाचेर या भागातील अनेक शेतकऱ्यांनी कालव्यातील गाय पहिली मात्र कालव्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने कुणीही कालव्यात उतरून गाय काढण्याचा प्रयत्न केला नाही.
मात्र खामखेडा येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय केदा मोरे यांना हे वृत्त कळताच त्यांनी मुलगा देवीदास मोरे व बंधू दीपक मोरे यांना सोबत घेत पिळकोस शिवारातील पांढरी पाडा रस्त्यालगत असलेल्या कालव्याच्या चारी नंबर ९ च्या गेटला अडकलेल्या गाईला पिळकोस येथील प्रवीण जाधव, आबा आहेर, भूषण आहेर या तरुणांना सोबत घेत रात्री नऊ वाजता कालव्यात आडव्या झालेला गाईला कालव्यामध्ये उतरत मोरे यांनी दोरीने व ट्रॅक्टरच्या साह्याने कालव्यातून मृत गाय बाहेर काढली.
चौकट...
वेळीच लक्ष दिल्याने अनर्थ टळला
अरुंद अशा कालव्यात गाय आडवी झाल्याने कालव्या मोठ्या प्रमाणावर फुगून पाण्याची पातळी वाढली होती. संजय मोरे व शेतकऱ्यांनी कालव्यातून गाय बाहेर काढली नसती तर मोठी हानी होऊन पश्चिमेकडे कालवा फुटून विभागाचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असते. रात्रीच्या वेळी भरपावसात मोरे व शेतकऱ्यांनी कालव्यातून गाय बाहेर काढल्याने त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
130921\img-20210911-wa0097.jpg
सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे