खामखेडा : सुळे डावा कालवा सध्या पूर्ण क्षमतेने वाहत असून या कालव्यात कळवण तालुक्यातील पश्चिम भागातून अनोळखी शेतकऱ्याची गाय पाटात पडून मृत अवस्थेत वाहत चाचेर व पिळकोस शिवारापर्यंत आली. ही मृत गाय पाटात आडवी झाल्याने कालव्याच्या पाण्याला अडथळा निर्माण होत होता. या वेळी खामखेडा येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय केदा मोरे यांनी सदर दुर्गंधी सुटलेली मृत गाय बाहेर काढत कालव्याचा प्रवाह मोकळा करून दिला.
या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सायंकाळी मृतावस्थेतील गाय पाहिली. मात्र गाय फुगल्याने ती दुर्गंधी सोडायला लागली होती. पिळकोस, याशिवाय कालव्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने कुणीही कालव्यात उतरून गाय काढण्याचा प्रयत्न करत नव्हते.
खामखेडा येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय केदा मोरे यांना ही माहिती कळताच त्यांनी मुलगा देवीदास मोरे व बंधू दीपक मोरे यांना सोबत घेत पिळकोस शिवारातील पांढरी पाडा रस्त्यालगत असलेल्या कालव्याच्या चारी नंबर ९ च्या गेटला अडकलेली व पूर्णत: फुगून तट्ट झालेल्या गायीला पिळकोस येथील प्रवीण जाधव, आबा आहेर, भूषण आहेर या तरुणांच्या मदतीने ट्रॅक्टरच्या साह्याने कालव्यातून बाहेर काढले. अरुंद अशा कालव्यात गाय आडवी झाल्याने कालव्याची पाण्याची पातळी वाढली होती. संजय मोरे व शेतकऱ्यांनी कालव्यातून गाय बाहेर काढली नसती तर मोठी हानी होऊन पश्चिमेकडे कालवा फुटून विभागाचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असते.
कोट.,..
पिळकोस व चाचेर भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी मला या घटनेविषयी सांगितले. कालव्यातून गाय काढली नाही तर कालवा फुटून हानी होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन मी माझ्या मुलासह भाऊ व काही शेतकऱ्यांना बरोबर घेत रात्रीच्या वेळेस कालव्यात उतरून गाय बाहेर काढली.
- संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते, खामखेडा
120921\img-20210911-wa0097.jpg
सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे